Ad will apear here
Next
मिशिगन विद्यापीठातील डॉ. स्टुअर्ट गॉर्डन शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात रिसर्च प्रोफेसर म्हणून रुजू


कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागामध्ये नव्याने सुरू झालेल्या रिसर्च प्रोफेसर योजनेअंतर्गत अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील प्राध्यापक स्टुअर्ट गॉर्डन यांची नियुक्ती करण्यात आली. नुकतेच ते रुजू झाले असून, मे २०२०पर्यंत ते कार्यरत राहतील. 

त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सारा दुआल यादेखील फुलब्राइट स्कॉलर म्हणून विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागात रुजू झाल्या आहेत. या दोघांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेतली. कुलगुरूंनी दोघांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमधून १९७२मध्ये पीएचडी मिळवली. त्यांनी मराठा राज्याविषयीच्या मूळ कागदपत्रांचा अनुवाद करण्यात अनेक वर्षे व्यतीत केली आहेत. सामाजिक बंधने आणि दरोडेखोरी, किल्ल्यांचे इतिहासातील योगदान, वारसा हक्क आणि राजपद, प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याची इतिहासातील उदाहरणे आणि युरोपीय पद्धतीच्या लष्कराचे झालेले अनुकरण अशा वैविध्यपूर्ण विषयांवर त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांनी राजघराण्यांच्या वापरातील प्रतीकात्मक वस्तू आणि राजघराण्यांचे मैत्रीसंबंध या विषयांवरही संशोधनात्मक लेखन केले आहे. 

डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांचा ‘द मराठाज्’ हा अत्यंत गाजलेला ग्रंथ असून, त्यामध्ये मराठे मूळचे कोण होते, त्यांनी प्रतिष्ठा कशी मिळवली, मराठ्यांनी महसूल व्यवस्था कशी विकसित केली, इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा ऊहापोह केलेला आहे.

(‘द मराठाज्’ या पुस्तकाचा र. कृ. कुलकर्णी यांनी केलेला अनुवाद ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZWYCF
Similar Posts
मोडी लिपी शिकायचीय? कोल्हापुरात मोफत प्रशिक्षण कार्यशाळा कोल्हापूर : मोडी लिपी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. ३० डिसेंबर २०१९ ते पाच जानेवारी २०२० या कालावधीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मोडी लिपीचे मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ यांच्यामार्फत मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे
प्रतिसरकार संकल्पना आजच्या तरुणांनी समजून घेण्याची गरज कोल्हापूर : ‘क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड व नागनाथअण्णा नायकवडी यांनी प्रतिसरकार स्थापन करून जनतेला न्याय दिला. महिलांना सन्मान दिला पाहिजे, सावकारी पाश समूळ नष्ट केले पाहिजेत म्हणून ग्रामसभा, तसेच स्वतंत्र न्यायसंकुल स्थापन केले. कमी खर्चात लग्न करण्यासाठी गांधी विवाह नावाची चळवळ उभी केली होती. एकूणच
‘खेती करो हरिनाम की, मनवा...’ खेती करो हरी नाम की मनवा, खेती करो हरी नाम की। पईसा ना लागे रुपिया ना लागे, कवडी न लागे फुटकी।। मन के बैल सुरत पोहावे, रसि लगाऊँ गुरू ग्यान की। कहत कबीरा सुन भाई साधु, भक्ति करो हरीहर की।। या आणि यांसारख्या कबीराच्या दोह्यांनी शिवाजी विद्यापीठाचा परिसर मकर संक्रांतीच्या दिवशी (१५ जानेवारी २०२०) नादमय होऊन गेला होता
शिवाजी विद्यापीठातर्फे परिसर छायाचित्रण स्पर्धा; ५० हजारांची पारितोषिके कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे शिवाजी विद्यापीठ परिसर छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे ५० हजार रुपयांची पारितोषिके व प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language